About Us

Actually, we wish to say very little about us! This website is not about us, but about persons and groups involved in social action.

Through this website, we wish to facilitate constructive interactions between social organizations, donors, volunteers and beneficiaries. We wish to build virtual (and virtuous!) bridges between these various vertices of the polygon of social action. We often come across citizens who wish to contribute to some noble cause; but they do not know where and what and how to contribute. This website will provide such concerned citizens with a set of informed choices.

Social organizations often need donations or voluntary participation for a specific project or goal. This website will help such organizations to find their potential contributors and volunteers.

Needy sections of the society who need and deserve to benefit from the activities of social organizations will also find their potential benefactors on this website.

In short, this website aims at promoting many many hand-shakes among organizations, volunteers, contributors and beneficiaries of social action. It will act as a sort of 'involvement consultant'.

Of course, this website aims at helping the needy. But we intend to use the term 'needy' in an unconventional sense. We believe that the contributor of social action is as needy as the beneficiary. Because, it is our own natural need to contribute to a noble cause, to be involved in some constructive social action. By contributing to a noble cause, we are not doing anyone any favour. We are only making our own existence more meaningful and worthy.

The name of the website (Social Pool) is partly bilingual. In English, the word 'pool' means 'collective contribution' and in vernacular, it means 'a bridge'!

So, friends, let us dive into this social pool to refresh our souls!

You can contact us on our e-mail id:
shrutimandar@gmail.com

Sanmay Paranjape
Dr Mandar Paranjape
Mrs Shruti Paranjape

आमच्याबद्दल

खरेतर आम्ही आमच्याबद्दल खूप काही बोलू इच्छित नाही! कारण ही वेबसाइट आमच्याबद्दल नव्हे; तर सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणार्‍या संस्था आणि व्यक्तींबद्दल आहे.

सामाजिक संस्था, देणगीदार, स्वयंसेवक आणि लाभार्थी यांच्यात विधायक सहकार्य घडवून आणणे हा या वेबसाइटचा हेतू आहे. सामाजिक कृतीच्या या विविध बिंदूमधील सेतू बनण्याचे काम ही वेबसाइट करेल.

समाजात असे अनेक नागरिक असतात की ज्यांना एखाद्या चांगल्या कायार्साठी योगदान देण्याची इच्छा असते. पण हे योगदान नेमके कोणते, कुठे आणि कसे द्यावे याची त्यांना नीट माहिती नसते. ही वेबसाइट अशा इच्छुक नागिरकांना योगदानासाठी निवडीचे विवध चांगले पयार्य सुचवेल.

सामाजिक संस्थांना अनेकदा त्यांच्या एखाद्या प्रकल्पासाठी किंवा उधिष्टासाठी विशिष्ट प्रकारचे योगदान (देणगी/श्रमदान/तज्ज्ञ‐सल्ला/कौशल्य) हवे असते. अशा संस्थांना अपेक्षित असलेले योगदान देऊ शकणारे संभाव्य देणगीदार, स्वयंसेवक शोधण्यास या वेबसाइटचा उपयोग होऊ शकेल.

समाजातील गरजू घटकांना त्यांच्या संभाव्य मदतकर्त्यांपर्यंत पोचायलाही या वेबसाइटचा उपयोग होईल.

थोडक्यात, ही वेबसाइट संस्था, देणगीदार, स्वयंसेवक, सल्लागार, कार्यकर्ते, लाभार्थी यांच्यात अनेक हस्तांदोलने घडवून आणेल. ही वेबसाइट सामिलकी‐सल्लागार (इनव्हॉलव्हमेंट कन्सल्टंट)चे काम करेल. गरजूंना मदत हे या वेबसाइटचे प्रयोजन आहेच; पण 'गरजू' हा शब्द आम्ही नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या अर्थाने वापरू इच्छितो. सामाजिक उपक्रमांच्या लाभार्थीएवढेच अशा उपक्रमांचे देणगीदार आणि कार्यकर्ते 'गरजू' असतात असे आम्ही मानतो. कारण, 'विधायक उपक्रमात यथाशक्ती आणि यथेच्छ सहभाग' ही आपल्या सगळ्यांचीच नैसर्गिक गरज असते! आपल्या योगदानामुळे आपण कुणावर उपकार करत नसतो; तर आपल्याच अस्तित्वाला अधिक अर्थपूर्ण बनवत असतो.

या वेबसाइटचे ‘सोशल पूल' हे नाव अंशत: द्विभाशी आहे.  इंग्रजीत 'पूल' म्हणजे 'सामुहिक योगदान' तर देशी भाषेत 'पूल' म्हणजे सेतू!

तर मित्रहो, आपण या सोशल पूलमध्ये सूर मारु या आणि आपल्या अंतरात्म्यास तजेला देऊ या!

आपण पुढील ई‐मेल वर आमच्याशी संपर्क साधू शकता.
shrutimandar@gmail.com

सन्मय परांजपे
डॉ. मंदार परांजपे
सौ. श्रुती परांजपे

Leave Comments

Comments